नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं, उच्च वेतनावर निवृत्ती वेतनाची मागणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ११ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सर्व पात्र निवृत्ती वेतनधारकांना अर्ज करता यावा, आणि अर्ज करतानाच्या विविध अडचणी दूर व्हाव्या या करता ही मुदत वाढ दिल्याचं केंद्रीय कामगार मंत्रालयानं ही शेवटची संधी दिली असल्याचं म्हटलं आहे.
यापूर्वी अर्ज करण्यासाठी कालपर्यंत मुदत होती. परंतु अद्याप १६ लाख अर्जांची प्रक्रीया पूर्ण झालेली नाही. म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे. निवृत्ती वेतनधारकांच्या वेतनाचे तपशील ऑनलाईन भरण्यासाठी नियोक्त्यांनाही ३ महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.