नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक कोटीहून अधिक प्राप्तिकर परतावा अर्ज कालपर्यंत प्राप्तिकर विभागाकडे जमा झाले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हा टप्पा बारा दिवस लवकर गाठला गेला आहे. गेल्यावर्षी आठ जुलै पर्यंत एक कोटी प्राप्तिकर परतावा अर्ज दाखल करण्यात आले होते.
करदात्यांना सुविधा मिळावी आणि प्राप्तिकर परतावा मिळण्याचा वेग वाढावा यासाठी प्रयत्नशील असल्याचं प्राप्तिकर विभागानं म्हटलं आहे. शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी आयटीआर अर्ज लवकरात लवकर दाखल करण्याचं आवाहन प्राप्तिकर विभागानं करदात्यांना केलं आहे.