मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगपालिकेत कोरोना काळात झालेल्या व्यवहारांसंदर्भात सक्तवसुली संचलनालयाकडून पालिकेचे माजी अतिरीक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांची आज चौकशी सुरू आहे. जयस्वाल यांना यापूर्वीही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं, मात्र ते त्यावेळी चौकशीला हजर राहिले नव्हते. ईडी नं आतापर्यंत ८ जणांचे जबाब नोंदवले असून २१ जून रोजी टाकलेल्या धाडीत कोट्यवधी रुपयांची रोकड, दागिने आणि काही कागदपत्रं ताब्यात घेतली. या संदर्भात ईडीनं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सचिव आणि युवा सेनेचे मुख्य समिती सदस्य सुरज चव्हाण यांचीही चौकशी केली. कोविड महामारीच्या काळात रुग्णांसाठी पिशव्यांच्या खरेदीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.