नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 22 नोव्हेंबरपासून सर्व राजकीय जाहिरातींना बंदी घालण्याचा निर्णय ट्वीटर या समाज माध्यमानं घेतला आहे.

राजकीय संदेशांचा प्रसार स्वतःच्या प्रयत्नांनी करायचा असतो ही प्रसिद्धी विकत घ्यायची नसते, असं ट्वीटरनं म्हटलं आहे. ट्वीटरचा प्रतिस्पर्धी असलेल्या फेसबुकनं अलीकडेच राजकीय जाहिरातींवर बंदीची शक्यता फेटाळली आहे.