नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गेल्या १५ वर्षांत दारिद्र्यनिर्मूलनात चांगली कामगिरी केल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. विविध घटकांवर आधारित जागतिक गरीबी निर्देशांकाबाबतचा अहवाल, संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम तसंच ऑक्सफर्ड गरीबी आणि मानव विकास उपक्रम यांनी प्रकाशित केला आहे. त्यामध्ये गेल्या १५ वर्षांत भारतातल्या ४१ कोटी ५० लाख नागरिकांचं उत्पन्न वाढलं आणि त्यांची दारिद्र्य रेषेवरील नागरिकांमध्ये गणना झाली असं नमूद करण्यात आलं आहे.भारतात गरीबीच्या सर्वच निर्देशांकात घट झाल्याचं आणि दारिद्र्य रेषेखालील घटकांचा तसंच राज्यांचा जलद गतीनं विकास झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे.