नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला रसायन आणि पेट्रोरसायन क्षेत्रातलं उत्पादन केंद्र बनवण्याच्या दृष्टीनं उत्पादकतेवर आधारित प्रोत्साहन योजनेचा विचार सरकार करेल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. नवी दिल्लीत आयोजित जागतिक रसायन आणि पेट्रोरसायन उद्योगांच्या तिसऱ्या शिखरपरिषदेत आज त्या बोलत होत्या.

२०४७ पर्यंत ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होण्याचं देशाचं उद्दिष्ट असून ते गाठण्याकरता सर्वच क्षेत्रांकडून योगदान मिळणं आवश्यक आहे.