नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराविरोधात झीरो टॉलरन्स हेच भारताचं धोरण असून भ्रषटाचाराचं निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासनासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जी-20 देशांच्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाच्या मंत्रिस्तरीय बैठकीला ते दूरस्थपणे संबोधित करत होते. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.