नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वत्रिक आरोग्य कवच तयार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य निगा क्षेत्रात गुंतवणुक करणं हा सगळ्यात समावेशक, न्याय्य आणि किफायतशीर मार्ग असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया प्रादेशिक समितीच्या ७६ व्या मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेत त्या बोलत होत्या. जनतेला केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय आरोग्य प्रणालींना अधिक सक्षम करण्याच्या महत्त्वावर भारताच्या जी-20 अध्यक्षपदानं भर दिल्याचं त्यांनी सांगितलं.