पुणे : राज्यातून बाल कामगार प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने समाजाच्या विविध घटकामध्ये या प्रथेविषयी जनजागृती करण्यासाठी 7 नोव्हेंबर 2019 ते 7 डिसेंबर 2019या कालावधीत संपूर्ण राज्यात कामगार आयुक्त डॉमहेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे

या अभियानामध्ये विविध संस्थाचालकमालक यांच्या बैठका घेवून बाल व किशोरवयीन (प्रतिबंध व नियमनकामगार अधिनियम, 1986 ची माहिती देणेतसेच यावर चर्चासत्रे आयोजित करून आस्थापना मालकचालक यांचेकडून बाल कामगार कामावर न ठेवणेबाबत हमीपत्र लिहून घेणेदुकाने तसेच आस्थापनेमध्ये बालकामगार कामावर न ठेवणेबाबतचे स्टीकर दर्शनी भागात प्रदर्शित करणेस्वयंसेवी संस्थाअंगणवाडी सेविकाआशा सेविका यांचे सहकार्याने अत्यल्प उत्पन्न असणाया पालकांचे प्रबोधन करणेपत्रके वाटणेवस्तीमधील लोकांना बाल कामगार निर्मूलन कार्यक्रमात सामावून घेणेविविध प्रसार माध्यमातून बालकामगार प्रथेविरूध्द जनजागृती करणेपथनाट्य प्रचार फेरी इत्यादी माध्यमातून जनजागृती करणे तसेच रेल्वे स्टेशनबसस्थानक परिसरामध्ये बाल कामगार प्रथा विरोधी स्वाक्षरी मोहिम राबविणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे हस्ते सदर अभियानाचे उद्घाटन करुन प्रत्यक्ष अभियानास सुरुवात करण्यात येणार आहेत्यानुसार पुणे जिल्ह्यातील अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयपुणे येथे 7 नोव्हेंबर 2019 रोजी होणार असल्याचे कामगार उप आयुक्त व्ही.सीपनवेलकर यांनी पत्रकान्वये कळविले आहे.