मुंबई (वृत्तसंस्था) : वाढत्या प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देणं गरजेचं असून यावर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे.  फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत मुंबई शहर आणि उपनगरातल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांशी त्यांनी संवाद साधला. शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रदूषणविरहीत दिवाळी साजरी करण्याबाबत मार्गदर्शन करावं, अशी सूचना त्यांनी सर्व मुख्याध्यापकांना केली.