नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या महिन्याच्या १७ तारखेला दुंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत २१२ व्या अधिकारी अभ्यासक्रमाच्या संयुक्त पदवी संचालनाचं निरीक्षण करतील. तसंच पदवीधर प्रशिक्षणार्थींना ‘प्रेसिडेंट कमिशन’ प्रदान करतील आणि फ्लाइट कॅडेट्स, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी तसंच परदेशातील मित्रांना ‘विंग्स’ आणि ‘ब्रेव्हट्स’ सादर करतील. ‘विंग्स’ आणि ‘ब्रेव्हेट्स’ पुरस्कार हा प्रत्येक लष्करी पायलटच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा आहे आणि प्रशिक्षणाच्या कारकिर्दीतला परमोच्च बहुमान असतो.