पिंपरी : महापौर आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत महापौर राहुल जाधव यांनी वाघेश्वर कॉलनी, देहु-आळंदी रस्ता, चिखली गावठाण, महादेव नगर, लोंढे वस्ती, रोकडे वस्ती येथे पाहणी दौरा केला व नागरीकांच्या भेटी घेऊन त्यांच्या सूचना, समस्या, अडीअडचणी बद्दल माहिती घेतली.