नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑटोमोबाईल आणि ऑटो घटकांसाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेचा कालावधी काही सुधारणांसह एक वर्ष वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.सुधारित योजने अंतर्गत,आर्थिक वर्ष २०२३-२४ पासून,एकूण पाच आर्थिक वर्षांच्या कालावधीसाठी हे प्रोत्साहन लागू राहील,असं अवजड उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.मंजुरी मिळालेला अर्जदार सलग पाच आर्थिक वर्ष लाभांसाठी पात्र असेल,मात्र ३१मार्च २०२८ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षा नंतर पात्र ठरणार नाही,असं यात म्हटलं आहे.ऑटोमोबाईल क्षेत्राला सुस्पष्टता आणि साहाय्य प्रदान करून विकास आणि स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी या सुधारणा उपयोगी ठरतील असं मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.