मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ५७० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यत आले. आतापर्यंत २ लाख ७६ हजार ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ५१६ नवीन रुग्णांची नोंद झाली.

मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी ३५९ दिवसांवर आला आहे.

आतापर्यंत रुग्णांची संख्या २ लाख ९४ हजार ९८५ झाली आहे. सध्या ६ हजार ९४३ रुग्ण उपचार घेत आहेत. काल ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा ११ हजार १३८ वर पोचला आहे.