नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कतारचे अमीर, शेख तमिम बिन हमद अल थानी यांची भेट घेऊन भारत आणि कतार यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यावर चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांनी काल दोहा इथं चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, वित्त पुरवठा यासह इतर क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्यावर प्रामुख्याने बोलणं झालं असं मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
संयुक्त अरब अमिरातीचा दोन दिवसांचा दौरा पूर्ण करुन प्रधानमंत्री मोदी काल संध्याकाळी कतारच्या दोन दिवसांच्या भेटीवर दोहा इथं पोहोचले. कतारच्या प्रधानमंत्र्यांनी मोदी यांच्या सन्मानार्थ मेजवानीचं आयोजन केलं होतं. दोहा इथल्या भारतीय समुदायानं मोदी यांचं जंगी स्वागत केलं.