नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मरण पावलेल्यांची संख्या १७ वर पोचली आहे. तर या विषाणूची बाधा झालेल्यांची संख्याही कालच ५५० वर पोचली होती. या विषाणूमुळे प्राणघातक न्यूमोनिया झालेला रुग्ण अमेरिका, हाँगकाँग, मंकाऊ आणि मेक्सिकोमधेही आढळून आल्याचं वृत्त आहे.
चीनमधल्या वुहान, शहरात या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. दरम्यान या विषाणूमुळे इतक्यातचं ‘जागतिक आपत्कालीन परिस्थिती जाहीर करणार नसल्याचं, जागतिक आरोग्य संघटनेच्या आणीबाणी समितीनं सांगितलं आहे.