नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनबाबतचा मुख्य सुरक्षा प्रश्न सोडवण्याची अमेरिकेची इच्छा नसल्याचं स्पष्ट झालं आहे, असं रशियानं म्हटलं आहे. यूरोपमधली शीत युद्धोत्तर सुरक्षा व्यवस्था, युक्रेनजवळ असल्यानं, मागे घेतली जावी, अशी मागणी रशियानं केली होती. त्यावरचं संयुक्त लेखी उत्तर काल अमेरिका आणि नाटो यांनी सादर केलं. ही मागणी अमान्य करून अमेरिकेनं युक्रेनचा तिढा सोडवण्याची इच्छा नसल्याचं दाखवून दिलं आहे, असं रशियानं म्हटलं आहे. मात्र याप्रकरणी चर्चेचं दार अद्याप खुलं असल्याचंही स्पष्ट केलं आहे. नाटोनं सुरक्षा फौजा मागे घेऊन या परिसरातला तणाव कमी करणं , हा सर्वात चांगला पर्याय असल्याचं रशियन परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं.