पुणे : सर्व राज्यशासकीय निवृत्तीवेतनधारकांना सन 2019-20 चे हयातीचे दाखले बँकेमध्ये शाखा निहाय सही, अंगठा करण्यास उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तरी निवृत्तीवेतनधारकांनी स्वत:च्या नावासमोर सही/अंगठा करावी तसेच इलेट्रानिक/डीजिटल हयातीचे दाखले देण्याची व्यवस्था कोषागार तसेच उपकोषागार कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे सोईनुसार कोणत्याही पद्धतीने हयातीचा दाखला देता येईल. हयातीचे दाखले अप्राप्त राहिल्यास माहे डिसेंबर 2019 पासून निवृत्तीवेतन बंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे यांनी प्रसिदधी पत्रकान्वये कळविले आहे.