नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरसाठीचं ३७०वं कलम रद्द करताना ३ ऑगस्टपासून बंद केलेली कश्मीर खोऱ्यातली रेल्वे सेवा आजपासून पुन्हा सुरु होत आहे.

रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यापूर्वी काल श्रीनगर ते बारामुल्ला मार्गावर यशस्वी चाचणी घेतल्याचं उत्तर रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितलं. या मार्गावरच्या रेल्वे सेवा आज सुरु होतील.

श्रीनगर ते बनिहाल या मार्गावरच्या रेल्वे सेवाही लवकरच टप्प्याटप्प्यानं सुरु होतील, असं या अधिकार्‍यांनी सांगितलं.