नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक दिव्यांग ‍अँँथलॅटिक्स स्पर्धेत सुंदर सिंग गुर्जरनं पुरुषांच्या भालाफेक प्रकारात विजेतेपद पटकावत टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेसाठी भारताला कोटा मिळवून दिला आहे.

दुबई इथं सुरु असलेल्या या स्पर्धेत अजित सिंग आणि रिंकू हे देखील कांस्यपदक मिळवत पॅरालिंपिक स्पर्धेसाठी कोटा पद्धतीतून पात्र ठरले आहेत. सुंदर सिंगनं ६१ पूर्णांक २२ मीटरची सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली.

याच स्पर्धेत योगेश कथुनिया यानं पुरुषांच्या थाळीफेक प्रकारात रौप्यपदक पटकावलं. त्यामुळे भारताची पदक संख्या पाच झाली असून, त्यात दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे.