मुंबई : एमजी मोटर्स ‘एमजी झेडएस’ या गतवर्षी लॉन्च करण्यात आलेल्या आपल्या पहिल्या इलेक्ट्रिकल कारचे अपडेटेड व्हर्जन ८ फेब्रुवारी २०२१ रोजी लाँच करणार आहे.
४ मिलियन उत्सर्जन-मुक्त किलोमीटर्स, ९३५ टन इतके कमी CO२ उत्सर्जन, जे ५६०७ पूर्ण वाढलेल्या वृक्षांइतके होते, १० ईव्ही इकोसिस्टम पार्टनर्स नेमले, देशभरातील चार्जिंग नेटवर्क मजबूत केले. हे सर्व कंपनीने अवघ्या एका वर्षात केल्याची माहिती दिली आहे. कंपनी आता नवीन चाप्टर सुरू करणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. भारतीय बाजारपेठेत एमजीची इलेक्ट्रीक कार ही इतरांपेक्षा वेगळी व हटके असणार आहे. एमजी मोटरने याआधी आपली इलेक्ट्रीक एसयूव्ही झेडएस लाँच केलेली. या कारची किंमत किती असणार आहे, याची माहिती ८ फेब्रुवारी रोजी उघड होणार आहे.