मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा फुले कृषी विद्यापीठातल्या उद्यानविद्या विभागातर्फे फळ पिकांवरील राष्ट्रीय समस्या आणि अडचणी विषयावरील एकवीस दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
प्रशिक्षणाचं उद्घाटन कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथ यांच्या हस्ते झालं. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतीमध्ये फळ पिकांशिवाय पर्याय नाही. फळपिकांच्या मुल्यवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं कुलगुरु म्हणाले.