नवी दिल्ली : ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना भारतीय कुटुंब व्यवस्थेसाठी प्राचीन काळापासून मार्गदर्शक असून आपली नैतिक आणि सामाजिक-सांस्कृतिक बंध या संकल्पनेभोवती गुंफलेले आहेत असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.
ते आज नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय जागतिक माता परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. मातृत्व साजरे करण्यासाठी ही परिषद आहे असे ते म्हणाले.
संपूर्ण जग मातांचे ऋणी असून जगात सर्व धर्म आणि प्रांतात मातांना विशेष स्थान आहे असे ते म्हणाले.
महिलांचा आदर आपल्या संस्कृतीच्या केंद्रस्थानी असल्याचे ते म्हणाले. महिलांची सुरक्षा आणि त्यांना समान दर्जा देण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज त्यांनी अधोरेखित केली.