नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विमानाच्या उड्डाणा दरम्यान विमानात काही प्रवाशांकडून केल्या जाणाऱ्या अशोभनीय कृत्यांवर नागरी विमान वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांना दिशानिर्देश जारी केले आहेत. विमानात असणारे पायलट, अन्य कर्मचारी यांनी अशोभनीय वर्तन करणाऱ्या यात्रींबरोबर त्या क्षणालाच नियमांनुसार कडक कारवाई करावी. काही दिवसांपूर्वी झालेल्या घटनांमध्ये विमानातल्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रवाशांवर योग्य ती कारवाई केली नव्हती. म्हणून संचालनालयाने हे दिशानिर्देश जारी केले आहेत.