नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भूचुंबकीय वादळामुळे सुर्य किरणांचा स्फोट होऊन स्पेस एक्सनं अंतराळात पाठवलेल्या जवळपास 40 ते 49 उपग्रहांना हानी झाली आहे. हे उपग्रह स्टारलिंक इंटरनेट दळणवळण नेटवर्कचा एक भाग आहेत. उपग्रहांना झालेली हानी फार वेगळी आणि मोठी असल्याचं मत हॉवर्डचे अंतराळ भौतिक शास्त्रज्ञ जोनाथन मॅकडॉवेल यांनी व्यक्त केलं आहे. स्पेस एक्सनं परवा या संदर्भातली माहिती माध्यमांना दिली. ही घटना पृथ्वी पासून 210 किलोमिटर घडल्याचं स्पेस एक्सनं सांगितलं. या उपग्रहांना अंतराळात पाठवण्याच्यावेळी काही अडचण आली, तर ती लगेच दुरुस्त करून पुन्हा अंतराळात पाठवणं सोपं जावं, म्हणून पृथ्वीच्या खालच्या कक्षात या उपग्रहांना ठेवलं जातं, असंही स्पेस एक्सनं सांगितलं आहे.