नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकॉगमधे कोवलून जिल्ह्यात हाँगकाँग पॉलिटेकनिक विद्यापीठात नव्यानं हिंसाचार उफाळला. निदर्शनं करणा-यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या फैरी झाडल्या, त्याला प्रत्युत्तर म्हणून कार्यकर्त्यांनी पेट्रोलबॉम्ब टाकले. त्यामुळे अनेक ठिकाणी आगी लागल्या.

प्रमुख रस्त्यावर टाकलेले अडथळे हटवण्यासाठी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी नागरिकांना मदत केल्यानंतर निदर्शनं सुरु झाली. हाँगकाँगनं त्यांची मदत मागितली नव्हती, असं सरकारी प्रवक्त्यानं स्पष्ट केलं. सरकारनं मदत मागितल्याशिवाय पी.एल.ए नं स्थानिक कामात ढवळाढवळ करु नये असं, लोकशाहीवादी खासदारांचं म्हणणं आहे.

हाँगकाँगमधल्या चीनच्या आरोपींच्या प्रर्त्यापणाला मंजूरी मिळाल्यानंतर हाँगकाँगमधे लोकशाहीच्या समर्थनार्थ निदर्शनं होत आहेत, त्यामुळे हाँगकाँगमधे आर्थिक मंदीचं वातावरण आहे.