नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हे आज संसदेत येताना विजेवरील मोटार गाडीत बसून आले. याबाबत पत्रकारांशी बोलताना जावडेकर म्हणाले की, प्रदुषणाच्या प्रश्नाबाबत सरकार आता हळूहळू वीजेवर चालणाऱ्या गाड्यांना प्रोत्साहन देत आहे.
जनतेनंही प्रदुषण मुक्तीसाठी सार्वजनिक सेवांचा त्याचप्रमाणे विजेवर चालणा-या गाड्यांचा उपयोग करावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.