मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २२ तारखेला होणाऱ्या मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा भाजपानं केली आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. आशिष  शेलार यांनी म्हटलं आहे की, कोणत्याही विरोधी पक्षाशी युती करण्याची आम्हाला इच्छा नाही.

मात्र दोन हजार बावीसमध्ये होणारी मुंबई महापालिका निवडणूक भाजपा स्वबळावर लढणार आहे. शिवसेना एऩडीएमधून बाहेर पडल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपानं हा निर्णय घेतला आहे. २२७ सदस्यांच्या महापालिकेत शिवसेनेचे ९४ सदस्य असून भाजपाचे ८१ आहेत. काँग्रेसचे ३० तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा नगरसेवक आहेत.