काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत सरकार स्थापनेबाबत चर्चाच झाली नसल्याचं पवार यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं.
राज्यातल्या एकदंर राजकीय स्थितीबाबत सोनिया गांधी यांना आपण माहिती दिली. परिस्थितीवर लक्ष ठेवून असून संयुक्त् पुरोगामी आघाडीतल्या इतर घटक पक्षांशीही चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.