नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकाक इथे सुरु असलेल्या आशिया तिरंदाजी विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी चमकदार कामगिरी केली. अतनू दास यानं कोरियाच्या ‘जिन हाईक ओह’ याला 6-5 नमवत कांस्यपदक पटकावलं. तरुणदीप राय आणि जयंता तालुकदार यांची चीनविरुद्धची कामगिरीही सुरेख झाली.

सोमवारी झालेल्या मिश्र स्पर्धेत, दास यानं दीपिका कुमारी समवेत कांस्य पदकाची कमाई केली. आज होणाऱ्या संयुक्त स्पर्धेच्या तीन फेऱ्यांंमध्ये, भारतीय तिरंदाज घवघवीत यश मिळवण्यासाठी सज्ज आहेत.