मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे नेतृत्व करत असताना त्यांचे वारसदार म्हणून पुतणे राज ठाकरे यांच्याकडेच पाहिले जात होते. परंतु बाळासाहेबांनी मुलगा उद्धव ठाकरेंकडे २००६ मध्ये पक्षाची धुरा साेपवली. गेल्या १३ वर्षांत उद्धव यांनी यशाची कमान चढती ठेवत, कधी आलेल्या अपयशाने खचून न जाता विधानसभेवर भगवा फडकवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करून आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली.

वक्तृत्व बाळासाहेबांसारखे नसले तरी उद्धव यांनी यशाची गरुडभरारी घेण्याची जिद्द कायम ठेवून ती पूर्ण करून दाखवली, हे या निमित्ताने सिद्ध झाले. आता ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव पुढे आले आहे.