नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ई-सिगारेट्सवर बंदी घालणारं विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकानुसार ई-सिगारेट्सचं उत्पादन, खरेदी-विक्री, वाहतूक, साठा आणि जाहिरात करण्यावर देशात निर्बंध लावण्यात आले आहेत.

यापैकी काहीही करणा-याला एक वर्षाची कैद आणि एक लाख रुपये पर्यंतचा दंड किंवा दोन्ही ठोठावण्याच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे. विधेयकाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं, की तंबाखू आणि निकोटीनचं व्यसन दूर ठेवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे.