पिंपरी : महापालिका उद्यान विभागातर्फे दिघी-विश्रांतवाडी रस्त्यामधील दुभाजक सुशोभिकरण करून त्याचे एक वर्ष देखभाल करण्याबाबत निविदा मागविण्यात आली होती. प्राप्त निविदाधारकांपैकी मेसर्स अथर्व स्वयंरोगार औद्योगिक संस्था यांनी महापालिकेच्या प्रस्तावित रकमेपेक्षा म्हणजे 7 लाख 28 हजार 810 रुपयांपेक्षा 3 टक्के कमी दराची निविदा सादर केली.

त्यांनी हे काम 7 लाख 16 हजार 646 रुपयांमध्ये करताना रस्ता दुभाजकामध्ये बोगनवेल व मोठी रोपे लावली. मात्र, आळंदी-पंढरपुर पालखी प्रस्थानाच्या वेळी वारक-यांकडून तीन हजार बोगनवेल रोपांचे नुकसान झाले आहे, असे उद्यान पर्यवेक्षक यांनी पत्रान्वये कळविले.

या रोपे दगावलेल्या ठिकाणी पुन्हा नव्याने इफोर्बियाची तीन हजार रुपये व वीस मोठी झाडे लावण्यात येणार आहेत. नगरसेवक विकास डोळस, हिराबाई घुले आणि निर्मला गायकवाड यांनी त्याबातची मागणी केली होती. त्यामुळे या रोपांच्या लागवडीसाठी महापालिकेला 88 हजार रुपयांचा वाढीव खर्च येणार आहे.