नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन देशांमधल्या सतरा वर्षांखालच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली आहे.

काल संध्याकाळी मुंबईत झालेल्या सामन्यात भारतानं थायलंडचा 1-0 नं पराभव केला. उद्या अंतिम सामन्यात भारताची गाठ स्वीडनशी पडणार आहे.