नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल क्रिकेट सामन्यांमध्ये काल चेन्नईमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघानं सनरायझर्स हैदराबाद संघाचा १० धावांनी पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सचं १८७ धावांचं आव्हान पार करताना सनरायझर्स हैदराबाद २० षटकांत १७७ धावा करू शकला. स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स संघाचा सामना पंजाब किंग्सबरोबर मुंबईत होणार आहे.