मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याच्या मुद्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. हा कायदा असंवैधानिक असल्याने राज्यात लागू करू नये, असं मत काँग्रेस पक्षाचे सदस्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच अशोक चव्हाण यांनी मांडलं.
संसदेनं मंजूर केलेल्या या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करता येणार नसल्याची भूमिका मांडत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच सुधीर मुनगंटीवार यांनी चव्हाण यांच्या असंवैधानिक या शब्दावर आक्षेप घेतला. या मुद्यावरून झालेल्या गदारोळानंतर सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं.