मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या विविध पद भरतीच्या ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या ” महापरिक्षा पोर्टल” प्रक्रिया आणि संबंधित कंपनी यांच्याबाबतीतला चौकशी अहवाल आल्यानंतरच यासंदर्भातली माहिती सभागृहासमोर ठेवू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं.
नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे या पोर्टलमध्ये अनेक त्रुटी आहेत मात्र कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असं ते म्हणाले. अकोला शिवणी विमानतळाच्या धावपट्टीचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संबंधितांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू , अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत दिली.
शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी राज्यातल्या महिला अत्याचारात वाढ झाल्याचं सांगत महिला सुरक्षेचा प्रश्न लक्षवेधी सुचनेच्या मध्यमातून उपस्थित केला, आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करण्यासाठी, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा करण्याची मागणी केली, यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदे आणि न्याय विभागाचा सल्ला घेऊन असा कायदा लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न केला जाईल असं सांगितलं.