नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं २०१९-२० या वर्षाकरता, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत पश्चिम बंगालला ४१४ कोटी ९० लाख आणि ओदिशाला ५५२ कोटी रुपये दिले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत बुलबुल चक्रीवादळाशी संबंधित प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून अतिरिक्त मदत दिल्याचं राय यांनी सांगितलं. आपत्ती निवारणाची प्राथमिक जबाबदारी ही राज्य सरकारची असते, मात्र परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक आणि इतर मदत करतं असंही राय म्हणाले.