नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एस.पी.जी.(SPG) अर्थात विशेष संरक्षण गट दुरुस्ती विधेयक २०१९, लोकसभेत मंजूर झालं. प्रधानमंत्री आणि त्यांच्या सरकार निवासस्थानी राहणर्‍या त्यांच्या निकटच्या कुटुंबियांना एस.पी.जी.(SPG) सुरक्षा देण्याची तरतूद या विधेयकात आहे.

माजी प्रधानमंत्री, आणि त्यांनी दिलेल्या निवासस्थानी राहणार्‍या त्यांच्या निकटच्या कुटुंबियांनाही एस.पी.जी.(SPG) सुरक्षा पुरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. मूळ कायद्यात फक्त प्रधानमंत्र्यांसाठी एसपीजी सुरक्षा पुरवण्याची तरतूद होती. असं गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी एसपीजी अधिक सक्षम करणारी सुधारणा या विधेयकात केली आहे.