नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी आज संध्याकाळी नवी दिल्लीला पोचतील. २१ तारखेला राष्ट्रपतीपदी आरुढ झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. उद्या राष्ट्रपती भवनात त्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी गोताबाया चर्चा करणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ते भेट घेणार आहेत. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकरही गोताबाया यांना भेटणार आहेत.