पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सन 2019-20 या आर्थिक वर्षातील जिल्हयाकरीता 20 % बीज भांडवल योजनेचे 50 व थेट कर्ज योजनेचे 100 भौतिक उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. 20 % बीज भांडवल योजना ही राष्ट्रीयकृत बँकामार्फत राबविली जाते. यासाठी प्रकल्प मर्यादा 5 लाख आहे. यात महामंडळाचा हिस्सा 20 % व बँकेचा हिस्सा 75 % असून लाभार्थींचा सहभाग 5 % आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्ष आहे. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे व संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे. थेट कर्ज योजना महामंडळामार्फत राबविली जाते. त्याची मर्यादा एक लाख रूपये आहे.
या योजनेत नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना व्याज आकारले जात नाही. थकीत राहिल्यास 4 % व्याज आकारले जाते. अर्जदाराचे वय 15 ते 55 वर्षे आणि सिबील क्रेडीट स्कोर किमान 500 इतका असावा. संपूर्ण कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रूपयापर्यंत असावे. शासनाच्या कौशल्य विचारामार्फत तसेच शासकीय / निमशासकीय संस्था मधून तांत्रिक प्रशिक्षण घेतले आहे त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्जासाठी व अधिक माहितीसाठी ओ.बी.सी.महामंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्र. बी, स.नं. 104/105, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी, येरवडा,पुणे – 411006 फोन नं.020-29703059 येथील जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा. असे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.