नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणार्या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्याचां संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी निषेध केला आहे. लोकसभेत काँग्रेसनं हा प्रश्न उपस्थित करत प्रज्ञा ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर राजनाथ सिंग यांनी सांगितलं की, महात्मा गांधी संपूर्ण देशासाठी आदर्श आहेत, आणि राहतील. गोडसेंचं समर्थन करणार्या विचारांचा आपण तीव्र निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
या प्रश्नी सभागृहात चर्चा व्हावी, असा आग्रह विरोधकांनी धरला होता, मात्र सभापती ओम बिर्ला यांनी त्याला नकार दिला. मग काँग्रेस, द्रमुक, तुणमूल काँग्रेस आणि इतर खासदारांनी सभात्याग केला. राज्यसभेत आम आदमी पार्टीचे के. के रागेश आणि संजय सिंग यांनी याबाबत तहकुबीची सूचना दिली होती. मात्र अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी ती फेटाळली.