नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान मुलांच्या अश्लील चित्रफीत बनवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची घोषणा केंद्र सरकारनं राज्यसभेत शून्य प्रहरात केली. याबाबत पॉस्को कायद्यात विशेष बदल करण्याची माहिती महिला आणि बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत माहिती दिली.

या तरतुदीनुसार गुन्हेगार विरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असंही त्या म्हणाल्या. १ ० ९ ८ या हेल्पलाईन नंबरवर तक्रार नोंदवता येईल, असं त्यांनी सांगितलं.