नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडनमधल्या प्रसिद्ध लंडन ब्रीजवर २ जणांना भोसकून मारणारा हल्लेखोर काल पोलिसांबरोबरच्या चकमकीत काल ठार झाला. त्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराच्या अंगावर स्फोटकं आढळली. हा दहशतवादी हल्ला असल्याचं लंडनच्या दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखांनी सांगितलं.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लंडनमधल्या नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं आवाहन केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.