नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि जपान या उभय देशांदरम्यान परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय स्तरावरची चर्चा आजपासून नवी दिल्लीत सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोटेगी आणि संरक्षण मंत्री टारो के.यांनी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या चर्चेसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. एस .जयशंकर भारतीय शिष्टमंडळाचं तर जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोटेगी आणि संरक्षण मंत्री टारो के.
जपानच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा होईल, उभय देशांमधलं संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं भारत जपान विशेष धोरणात्मक जागतिक सहकार्य वाढवण्यासाठी ही एक संधी आहे. या बैठकीत भारत प्रशांत क्षेत्रातली परिस्थिती तसंच भारत आणि जपान या देशांमधल्या नागरिकांची प्रगती, समृद्धी आणि शांततेसाठी या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.