नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकाँगमधे अतिशय जास्त प्रमाणावर पोलिस बळाचा वापर होत असल्याबद्दल संयुक्त् राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बॅशलेट यांनी चौकशीची मागणी केली आहे. मात्र, बॅशलेट यांची देशाच्या अंतर्गत व्यवहारात अनुचित हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत चीननं ही मागणी फेटाळून लावली आहे.

जिनिव्हामधे नियुक्त चीनच्या शिष्टमंडळानं म्हटलं आहे की, बॅशलेट यांचा ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या वृत्तपत्रातला लेख चुकीचा आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतल्या तत्वांचं उल्लंघन करणारा आहे.