नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जालंदर इथं झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आशियाई रौप्य पदक विजेता गुरप्रित सिंग आणि सुमित कुमार यांनी सुवर्ण पदक पटाकवलं. गुरप्रितनं दोन वेळा कनिष्ठ गटाचा विश्वविजेता संजन भानवल याचा 3-1 असा पराभव करुन 77 किलो वजनी गटाची, जिंकली.
गुरप्रितचं हे चौथं राष्ट्रीय विजेतेपद आहे. सुनील कुमारनं अंतिम मुकाबल्यात पंजाबच्या प्रभालवर 5-1 असा विजय मिळवून 87 किलो वजनी गटाचा किताब जिंकला. 55 किलो वजनी गटात सेनादलाच्या अर्जुननं अजय वर तांत्रिक गुणाच्या आघाडीनं मात केली. 82 किलो वजनी गटात आशियाई रौप्य पदक विजेता हरप्रित सिंग यांनी राजबिर छिक्रा याचा 4-1 असा पराभव केला.
या स्पर्धेत रेल्वेनं 210 गुणांसह पहिलं, सेनादलानं 170 गुणांसह दुसरं, तर झारखंडनं 109 गुणासह तिसरं स्थान मिळवलं.