नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार आजपासून इंद्रधनुष या प्रमुख लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करणार आहे. या मोहीमेअंतर्गत घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलियो, क्षयरोग, कांजण्या, मेंदुज्वर आणि काविळ या आजांरांना प्रतिबंध करण्यासाठी गर्भवती महिला आणि २ वर्षांखालच्या बालकांचं लसीकरण केलं जाईल.

याशिवाय काही ठराविक क्षेत्रांमध्ये जपानी मेंदुज्वर आणि फ्ल्यू या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केलं जाणार आहे. डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० या काळात देशभरातल्या २७ राज्यांमधल्या २७२ जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये या मोहीमेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं होतं.