नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलातल्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान काल सब लेफटनंट शिवांगी यांनी मिळवला आहे. बिहारच्या मुजफुरमधल्या शिवांनी यांनी काल हा इतिहास घडवला.

त्या गेल्या वर्षीच्या जून महिन्यात भारतीय नौदलात दाखल झाल्या होत्या. डॉर्निअर वैमानिक म्हणून ३ महिला वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं.