नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमध्ये किनारपट्टी आणि डोंगराळ जिल्ह्यांमध्ये गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरुच आहे. यामुळे १० हून अधिक जिल्ह्यांमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुख्यमंत्री ई. पलानीसामी आज या जिल्ह्यांना भेट देणार आहेत.

अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे केरळ लगतच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, राज्याच्या ४ हजार ४०० आपत्तीप्रवण क्षेत्रातल्या ९ हजार महिलांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

१०७७ आणि १०७० हे हेल्पलाईन क्रमांक कार्यन्वित करण्यात आले आहेत.